कलाकार · शिक्षण · साधना

सुरमणी मृणाल नाटेकर – भिडे

संगीत भूषण पंडित राम मराठे यांची नात

प्रतिष्ठित व्यासपीठांवर मुंबई, गोवा, ग्वाल्हेर, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, पुणे, देवास, विजयनगरम आणि वाराणसी येथे उल्लेखनीय सादरीकरणे.

Sur Mani Mrunal Natekar-Bhide singing Hindustani Classical Music
सुरमणी मृणाल नाटेकर - भिडे
01 — तालीम व शिक्षण

शास्त्रीय संगीत शिक्षण व थोर गुरूंचे मार्गदर्शन

उच्च शैक्षणिक व संगीत पदवी (Academic Excellence)

• S.N.D.T. University मधून M.A. with Distinction
• अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय ची संगीत विशारद with Distinction

गुरुकुल तालीम (Gurukul Training)

• वयाच्या ७ व्या वर्षापासून वडील पं. प्रदीप नाटेकर (पं. राम मराठे यांचे पट्टशिष्य आणि जावई) यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू झाले
• तसेच आजोबा संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्याकडे राहताना त्यांच्याकडूनही संगीताचे धडे गिरवण्याचा योग आला आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
• टप्पा गायकीसाठी विदुषी पंडीता नीलाताई भागवत यांच्याकडे विशेष अध्ययन.

गायकीचे विविध प्रकार (Vocal Styles Mastered)
शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय नाट्यसंगीत अभंग ठुमरी कजरी होरी टप्पा तराणा
02 — सन्मान व गौरव

पुरस्कार, स्कॉलरशिप व बहुमान

‘सुरमणी’ पुरस्कार
प्रसिद्ध ‘सूर सिंगार संसद’ कडून अभिजात शास्त्रीय गायनासाठी प्रदान करण्यात आलेला मानाचा ‘सुरमणी’ किताब.
A.I.R. 'B+' Grade Artist
All India Radio (आकाशवाणी) व दूरदर्शनची क्लासिकल आणि नाट्य संगीताची मान्यताप्राप्त B+ Grade आर्टिस्ट.
कै. प्रभाकर भालेकर पुरस्कार
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दिलेला प्रतिष्ठित "कै. प्रभाकर भालेकर" पुरस्कार.
दिग्गजांचा विशेष आशीर्वाद
उस्ताद अल्लादीया खाँ यांचे नातू उस्ताद अजिजुद्दीन खाँ यांच्याकडून गायकीसाठी कौतुकाची थाप व विशेष आशीर्वाद.
संगीत स्पर्धा प्रथम पारितोषिक
कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी येथे एकाच काळात झालेल्या तीन प्रतिष्ठित संगीत स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
स्वतःही बंदिशींची रचना
स्वतःही काही बंदीशींच्या रचना (composition) केल्या आहेत.
युवा गायिका व प्रभा फाऊंडेशन पुरस्कार
शास्त्रीय संगीतातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'युवा गायिका पुरस्कार' आणि 'प्रभा फाऊंडेशन' तर्फे विशेष गौरव.
दादर माटुंगा कल्चरल सेंटर स्कॉलरशिप
शास्त्रीय संगीताच्या प्रगत अध्ययनासाठी दादर माटुंगा कल्चरल सेंटरची मानाची स्कॉलरशिप प्राप्त.
'Master's Inspiration' CD Release
मीरा म्युझिक (Meera Music) तर्फे "Master's Inspiration" ही विशेष शास्त्रीय गायनाची म्युझिक CD प्रदर्शित.
बालनाटकासाठी पार्श्वगायन
"जिनी मिनी ची गोष्ट" या बाल नाटकासाठी पार्श्वगायन.
गानवर्धन संस्थेचा "स्वरगंधा संगीत परिवार पुरस्कार"
शास्त्रीय संगीतातील योगदानाच्या सन्मानार्थ, गानवर्धन संस्थेतर्फे ‘स्वरगंध संगीत परिवार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
03 — मंच व महोत्सवी मैफिली

प्रमुख संगीत महोत्सव व व्यासपीठे

मुंबई, गोवा, ग्वाल्हेर, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, पुणे, देवास, विजयानगरम् तसेच विदेशातही विविध प्रतिष्ठित व्यासपीठांवर गायनाचा प्रभाव.

✦ महाराष्ट्र महोत्सव
✦ भीमसेन जोशी अध्यासन- ललित कला केंद्र पुणे
✦ नेहरू सेंटर, मुंबई
✦ यशवंतराव चव्हाण सेंटर- मुंबई
✦ कारुळकर फाउंडेशन उंबरगाव -गुजरात
✦ ४५ कल के कलाकार संगीत संमेलन मुंबई
✦ स्वरगंगा महोत्सव
✦ अल्लादिया खाँ महोत्सव, चेंबूर
✦ पं. रामभाऊ मराठे स्मृती संगीत महोत्सव
✦ पं. पलुस्कर व रहीमत खाँ महोत्सव
✦ स्वामी हरिदास संगीत संमेलन
✦ स्वर भास्कर बैठक आर्ट सर्कल, रत्नागिरी
✦ कृष्णावेणी उत्सव, नरसोबाची वाडी
✦ चतुरंग प्रतिष्ठान — चैत्र पालवी
✦ जागतिक रंगकर्मी दिवस (मराठी नाट्य कलाकार संघ)
✦ स्वरचंद्र संगीत महोत्सव
✦ अंबरनाथ संगीत सभा मैफिली
✦ स्वर मल्हार, बेळगाव
✦ वसंतराव देशपांडे संगीत महोत्सव, चिंचवड
✦ सुविधा गोखले संगीत सभा, मुलुंड
✦ N.C.P.A. मुंबई व देवल क्लब, कोल्हापूर
✦ पं. रामभाऊ मराठे जन्मशताब्दी सांगता समारंभ
✦ श्री गुरु मंदिर कारंजा लाड जन्मोत्सव
✦ पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी "स्वरालयातील तुळस"
04 — छायाचित्र दालन

मैफिली, साधना व आठवणी

मृणाल नाटेकर – भिडे यांच्या संगीत प्रवासातील काही विशेष क्षणचित्रं व छायाचित्रे

पहा संपूर्ण छायाचित्र दालन (६०+ फोटो) →
मैफिली, संगीत कार्यक्रम व मार्गदर्शनासाठी संपर्क साधा
संपर्क साधा →